अंबाजोगाईक्राईम डायरी

“त्या” सोनाराचा दहा लाख रूपयांचा ऐवज पळवील्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल

अंबाजोगाई: स्कुटीच्या डिकीत ठेवलेल्या सोन्याचे दागिन्यासह स्कुटी पळून गेल्याची घटना शहरात भरदिवसा सोमवारी ( दि. ७) सकाळी १० वाजता घडली होती. स्कुटी सह दहा लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील सोन्याचे व्यापारी राहुल राठोड यांच्या सोन्याच्या दुकानाच्या शटरच्या कुलुपात फेवीक्विक व इतर साहित्य टाकून शटरच्या कुलूपा चे तोंड बंद केले होते. सकाळी कुलप उघडत नसल्याने ते चावी वाल्यासोबत बोलत असताना चोरट्यांनी त्यांची स्कुटी घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी सोनार राहुल राठोड यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दहा लाखांचा ऐवज चोरी

सोनार राहुल राठोड यांनी दिलेल्या तक्रारी नुसार चोरी गेलेल्या दागीन्यामध्ये मिन गंठण, नेकलेस, झुमके, सोन्याचे फुले, अंगठ्या, बाली व सोन्याचे मणी व जुनी वापरातील स्कुटी असा 10 लाख 13 हजार 293 रुपये किमतीचा ऐवज पळवील्याचे नोंद पोलीसात करण्यात आली आहे. दरम्यान चोरुन नेलेली स्कुटी मंगळवारी सकाळी शहरातील एका हॉटेलच्या समोर लावलेली मिळून आली. या प्रकरणाचा अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!