केज

वाहन अपघातातील सदोष मनुष्य वधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

गौतम बचुटे/केज:- निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातात झालेल्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून एकाची केज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

या बाबतची केज न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याची माहिती अशी की, दि. २१ जुलै २०१६ रोजी फुलचंद जनार्धन थोरात हे त्यांच्या केज-अंबाजोगाई रस्त्या वरच्या ढाकेफळ येथे शेता जवळ जय जिजाऊ नावाच्या रसवंती समोर उभे होते. त्या दिवशी दुपारी ४:०० वा. सुमारास त्यांनी त्यांची मोटार सायकल क्र . (एमएच-१२/ईडब्ल्यू- ७४५९) त्या रसवंती समोर रस्त्याच्या कडेला उभी करून ते तेथे थांबले होते. त्याच वेळी अंबाजोगाई कडून एक डस्टर गाडी क्र. (एमएच-२३ /एजी-९००९) ही भरधाव वेगात आली. तिने केज कडून येणाऱ्या वाहनाला समोरुन कट मारला. त्या डस्टर गाडीने त्याच्या मोटार सायकलला धडक दिली. त्यामुळे ती गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जावून धडकली. त्या अपघाता त्याच्या दोन्ही पायाच्या पंज्याला मार लागला व मोटार सायकलचे नुकसान झाले. तसेच त्या डस्टर गाडी मधील लोकांना गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरील प्रवाशांनी त्यांना सर्वांना ग्रामीण रुग्णालय केज येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान फुलचंद जाधव यांचा मृत्यू झाला.

या वरून आरोपा वरून चालक राहुल आत्माराम डोंगरे रा. हिरापूर ता. गेवराई जि बीड याच्या विरुध्द गु.र.नं. १७/२०१६ भा.दं.वि. च्या कलम २७९, ३३७, ३३८ व ३०४ (अ) खाली युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नुसार केज न्यायालयात दोषारोपपत्र क्र. ५४९/२०१६ नुसार दोषारोपपत्र दाखल झाले.

या प्रकरणात अभियोग पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्या पैकी अशोक थोरात, अमोल थोरात, शशिकला राऊत, श्रीराम काळे यांची साक्ष नोंदविण्यात आली. परंतु कथित आरोपी हे निष्काळजीपणे किंवा हयगयीन गाडी चालवीत होते किंवा मृत्यूस कारणीभूत ठरले हे सिध्द झाले नाही. उपलब्ध साक्ष पुराव्या आधारे आणि दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. एस. संकपाळे यांनी आरोपी चालक राहुल डोंगरे यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

राहुल डोंगरे यांच्या वतीने ॲड ए. जे. देवधरे यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक पोलीस अभियोक्ता ॲड. डी. आर. घुले यांनी काम पाहिले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!