अंबाजोगाई

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

अंबाजोगाई:  येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर मॅडम यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या विशेष सत्र केस नं. 78/2020 महाराष्ट शासन वि. अशोक मारूती सरवदे या प्रकरणातील आरोपीने अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. सदर प्रकरणात आरोपीस मा. न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला.

या प्रकरणातील आरोपी अशोक मारूती सरवदे, रा. साबळा, ता. केज याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले व सदर आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानुसार आरोपीस सदरचे प्रकरणात मा. न्यायालयाने जामीन दिला असता व जमानतीवर सुटल्यावर सदर आरोपीने परत पुन्हा पिडीतेस फोन करून लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवून गेला व नवरा बायको सारखे राहून ती अल्पवयीन आहे, हे माहिती असताना सुध्दा अनेकवेळा अत्याचार केला. विशेष बाब म्हणजे सदर आरोपी हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. तरी देखील सदर अल्पवयीन पिडीतेस साबळा, ता. केज येथून पळवून नेले व अनेकवेळा बलात्कार केला. सदर फिर्यादीवरून दि. २८/०९/२०२० रोजी पो. ठा. केज येथे गु.र.नं. 405/2020, कलम – ३६३, ३७६,३७६(J)(n) भा.द.वी सहकलम – ४,६,८,१० बा.लैं.अ.प्र. का. अन्वये गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरण हे आरोपीस तुरुंगात ठेवूनच चालविण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले व मा. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲङ अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले व त्यांना ॲङ  आर. एम. ढेले, व ॲङ  नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. बाबुराव सोडगीर व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!