अंबाजोगाई

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्षे शिक्षा व दंड

अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल

अंबाजोगाई:  येथील मा. सत्र न्यायाधीश श्रीमती एम. बी. पटवारी मॅडम यांच्या पुढे चालू असलेल्या विशेष बा. लॅ. अ. प्र. प्रकरण क. २०/२०१६ महाराष्ट्र शासन वि. गणेश शिवाजी कराड. या प्रकरणामध्ये आरोपी हा ३४ वर्षाचा इसम असुन त्याने दि. १५/१०/२०१६ सायंकाळी ५ वा. च्या सुमारास अल्पवयीन मुलगी शिकवणीच्या क्लास वरून परत येत असताना मोंढा मार्केट परळी वै. येथे तिला वाटेत अडवून तिचा उजवा हात वाईट हेतूने धरून तिस लज्जा वाटेल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला.

त्यावरून फिर्यादीने पोलीस स्टेशन परळी शहर येथे कार दाखल केली होती. त्यावरून आरोपी विरुध्द कलम ३५४ अ. भा.द.वी सहकलम ७,८ पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदर खटला अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात चालू होता. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले व सरकार पक्षाचा साक्षीपुरावा व सरकारी वकील ॲड. रामेश्वर मन्मथप्पा देले यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस दोषी धरून आरोपीस तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल ॲड रामेश्वर अन्मयप्पा ढेले यांनी बाजू मांडली व त्यांना वरीष्ठ सरकारी वकिल ॲड अशोक व्ही कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आणि कोर्ट पैरवी म्हणून पो. ना. बी. एस. सोडगीर व म. पो. हे मंदा तांदळे यांनी सहकार्य केले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!