केज
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतः पोलीस उपनिरीक्षक उतरले रस्त्यावर !

गौतम बचुटे/केज :- केज येथील छत्रपती शिवाजी चौकात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे रस्त्यावर उतरले. त्यांच्या सोबत पोलीस नाईक जीवन करवंदे आणि इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बंदोबस्त आणि तपासाच्या व्यस्त कामातून वाहतूक कोंडी जाणवताच त्यांनी स्वतः रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडवून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे.