केज तालुक्यातील सौंदना शिवारात ३२ शेतकऱ्यांचा सुमारे १०० एकर ऊस जळून खाक

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील सौंदना येथे ३२ शेतकऱ्यांचा शंभर एकर ऊस विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील सौंदना येथे आज दुपारी १२:०० वा. च्या दरम्यान विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून परिसरातील सुमारे ३२ शेतकऱ्यांचा शंभर एकर ऊस जळून खाक झाला आहे. याची माहिती तहसीलदार दुलाजी मेंडके यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अधीनिस्त मंडळ अधिकारी व तलाठी यांना ही माहिती कळविली. तसेच कृषी सहाय्यक गोविंद टोपे हे घटनास्थळी हजर होते. तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी ही माहिती अग्निशामक दलाला दिली. त्या नंतर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी हजर झाली. मात्र आग प्रचंड असल्याने आटोक्यात आणता येणे अशक्य होते. ऊस जळून खाक झालेल्या शेतकऱ्यात रमेश भिसे, रुक्मीन भिसे, गणेश भिसे, स्वाती भिसे, राजामती भिसे, प्रदीप भिसे, नरसु भिसे, सुरेखा नांदुरे, अविनाश नांदुरे, अशोक नांदुरे, रूपाबाई दहिरे, शहाजी भिसे, महादेव चव्हाण, धनंजय नांदुरे, राजाभाऊ भिसे, अनुरथ भिसे, शाहू भिसे, बाबासाहेब भिसे, प्रेमदास भिसे, बाबासाहेब भिसे, कृष्णदीप भिसे, साहिल भिसे, नितीन भिसे, मंदाबाई चव्हाण, भानुदास चव्हाण, ब्रह्मदेव भिसे, युवराज कटकुरे, सतीश चव्हाण, उषा भिसे, रामचंद्र भिसे, अमर चव्हाण या शेतकऱ्यांचा समावेश आहे.