केज

केज येथे दहा वर्षाचा मुलगा सापडला : पालकांनी केज पोलिसांशीही संपर्क साधावा

गौतम बचुटे/केज :- केज येथील बस स्टँडवर दहा वर्षे वयाचा मुलगा सापडला असून तो तेलगू भाषिक आहे. त्याचे पालक किंवा त्याच्या विषयी माहिती असणाऱ्यांनी केज पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या बाबतची माहिती अशी की, १६ मार्च रोजी केज येथील बस स्टँडवर एक दहा वर्ष वयाचा मुलगा सापडला आहे. काही जागरूक नागरिकांनी त्याला केज पोलीसांच्या ताब्यात दिला आहे. त्याला तेलगू भाषा समजत आहे व तेलगू भाषे शिवाय इतर कोणतेही भाषा समजत नाही किंवा बोलता येत नाही. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी दुभाषकाची मदत घेऊन त्याच्या कडून माहिती जाणून घेतली असता त्याची आई गावोगाव फिरून केसांवर कटलरी वस्तू विक्री करीत आहे त्याचे नाव प्रदिप, वडिलांचे नाव शिवा, आईच्या नाव लक्ष्मी, लहान बहिणीच्या नाव उषा आहे. त्याचे कुटुंब हे आंध्रप्रदेश राज्यातील हैदराबाद येथील लिंगमपल्ली येथील आहे.

संपर्क साधण्याचे आवाहन

त्याच्या आईवडील आणि पालकाच्या बाबत कुणाला काही माहिती असेल; तर सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे (8801646464), सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे (830830251, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील (9168203198) आणि पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे (9823438789) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!