केज

केज मध्ये घरात मृतदेह आढळला

गौतम बचुटे/केज :- केज येथील फुले नगर येथे घरात एका ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला असून सदर इसम हा एकटाच घरात राहत असल्याने हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ११ शनिवार रोजी केज येथील महात्मा फुले नगर या भागातील एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलीसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, अशोक नामदास आणि शमीम पाशा यानी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली असता त्यांना घरात सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तो मृतदेह हा सुनील किसन हजारे वय (४५ वर्ष) याचा असल्याचे स्पष्ट झाले. सुनिल हजारे हे केज येथे एकटेच राहत होते. त्यांचे कुटुंब बीड येथे राहत आहे. त्यांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाला असावा; परंतु घरी कोणी नसल्याने त्यांचा मृतदेह घरात पडून राहिला. असा अंदाज आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!