केजक्राईम डायरी

केज येथे ४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग : आरोपी पोलीसांच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :– केज शहरात एका ४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १४ फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी १:०० वा. च्या दरम्यान केज येथे होळ येथील एका नराधमाने फिर्यादी महिलेच्या घराच्या गेट वरुन उडी मारून घरात प्रवेश केला. तिला माझ्या सोबत येत नाही ? असे म्हणुन चापट मारुन तिचा उजवा हात वाईट हेतुने धरुन अंगाला झोंबाझोबी केली. तसेच तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादी वरून दि. १४ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८/२०२२ भा.दं.वि. ३५४(अ), ४५२, ३२३, ५०४ व ५०६ नुसार पोलीस ठाणे अमंलदार सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे या तपास करीत असून गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!