केजक्राईम डायरी

केज येथे महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न, चोरटे सीसीटीव्हीत कैद

गौतम बचुटे/केज:  केज येथे पहाटे ४:०० वा. दरम्यान कानडी रोड वरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा दोन अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला.मात्र एटीएम मधील रक्कम चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे अनर्थ टळला.

या बाबतची माहिती अशी की दि. २२ फेब्रुवारी मंगळवार रोजी पहाटे ३:५१ वा. च्या दरम्यान केज जिल्हा बीड येथील कानडी रोड असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम दोन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ते दोन अज्ञात चोरटे कैद झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी पोलीस पथकाला पाचारण करून शोध लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!