केजक्राईम डायरी

केज तालुक्यात परस्पर विरोधी विहिरीवरील मोटारी चोरल्याचे गुन्हे दाखल

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथे दोन शेतकऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात परस्परविरोधी विहिरीवरील विद्युत पंप व इतर साहित्य चोरी केल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल केल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. ५ मे रोजी उद्धव माधव केदार याने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. २७ एप्रिल रोजी सांगवी (सारणी) माणुसमारीचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या त्याच्या शेतातील विहिरीवरील नेल्सन कंपनीची विद्युत मोटार आणि वायर ज्याची किंमत १८ हजार ७७५ रु. आहे. असे साहित्य अशोक तुकाराम केदार, दत्तू भगवान केदार, हनुमंत दत्तू केदार, लक्ष्मण नारायण केदार व पांडुरंग नारायण केदार या पाच जणांनी चोरून नेल्याचे त्याने पाहिले. यामुळे त्यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांच्या विरुद्ध गु र नं १५२/२०२२ भां. दं. वि. ३७९ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे करीत आहेत.
तर त्यांच्या विरुद्ध लक्ष्मण नारायण केदार याने केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. २५ एप्रिल रोजी सांगवी सारणी येथील त्यांच्या शेतातील विहिरीतील टॉरमॅक कंपनीची १८हजार ५०० रु. किमतीची पाण्याची मोटार ही वसंत उद्धव केदार, उद्धव माधव केदार व पुष्पा उद्धव केदार या तिघांनी चोरून नेत असताना त्यांनी पाहिले त्यावरून तिघांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १५३/२०२२ भा. दं. वि. ३७९ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास पोलीस नाईक दिलीप गित्ते हे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!