केज

तरुणामुळे वाचले जखमी हरिणाचे प्राण !

गौतम बचुटे/केज :- पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडीत असलेले हरणाच्या कळपातील एक हरीण पाय घसरून ऐन सिमेंटच्या महामार्गावर पडून जखमी झाले होते. मात्र त्यावेळी तेथे हजर असलेल्या काही तरुणांच्या प्रयत्नामुळे त्या जखमी हरिणाचे प्राण वाचले.

या बाबतची माहिती अशी की, दि २९ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान केज येथे केज-बीड रोडवरील टाकळी फाट्या जवळ असलेल्या हॉटेल येरमाळा मच्छी स्पेशल हॉटेल समोर पाण्याच्या शोधत हरिणांचा कळप रस्ता ओलांडीत असताना त्यातील एक हरीण सिमेंटच्या रस्त्यावर पडून जखमी झाले. जखमी हरीण तडफडत असलेले पाहून तेथे उपस्थित असलेले रवि काळे, सर्जेराव देशमुख, युसूफ आतार, रतन खाडे, विजय घोळवे, शेख नवाज या तरुणांनी त्या जखमी हरिणाला पाणी पाजले व सुरक्षित ठिकाणी ठेवून याची माहिती तात्काळ पोलीस नाईक मंगेश भोले यांना दिली. त्या नंतर मंगेश भोले यांनी जखमी हरिणाची माहिती पत्रकार गौतम बचुटे यांना देताच त्यांनी वनविभाग धारूर येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या नंतर मंगेश भोले व पत्रकार गौतम बचुटे हे ताततडीने घटनास्थळी पोहोचले. त्या नंतर वन परिमंडळ धारूरचे एस. जी. वरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक शाम गायसमुद्रे हे सरकारी वाहनाने घटनास्थळी पोचले. त्यांनी त्या जखमी हरिणावर उपचार करण्यासाठी सरकारी वाहनातून त्याला धारूर येथे घेऊन गेले. तरुणांच्या सातर्कतेमुळे जखमी हरिणाचे प्राण वाचले अन्यथा ते हरीण वेदनेने किंवा शिकारी कुत्र्यांची शिकार झाले असते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!