अंबाजोगाई

पू. श्री.नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने उच्चशिक्षणासाठी गरजू विद्यार्थांना अर्थिक मदतीचे वितरण

अंबाजोगाई:  केवळ आर्थिक कारणांमुळे ज्या गरीब परंतु गुणवान विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणात अडचण येऊ शकते त्यांना हातभार लावणे ही या श्री.नारायणदादा काळदाते उच्चशिक्षण सहाय्यता निधी योजनेमागची मुख्य भुमिका आहे.

नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने 4 विद्यार्थ्यांना 1,00,000/- रू.ची मदत देण्यात आली. ही मदत प्रतिष्ठान चे सचिव डॉ.नरेंद्र काळे, सहसचिव मा.डॉ.नवनाथ घुगे, संचालक मा.अनिकेत लोहिया, मा.अंगदराव तट, प्रा.रूपेश देशमुख श्री.विलास नागवसे, श्री.विलास काचगुंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.  श्री.नारायणदादा काळदाते उच्चशिक्षण सहाय्यता निधीसाठी आत्ता पर्यंत एकुण 50 दात्यांनी आर्थिक मदत दिली आहे. विद्यार्थ्यांना ही मदत बिनव्याजी परतफेडी स्वरूपाची असुन विद्यार्थी कमावता झाल्यास तो दिलेली मदत इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी परत करतो. हा उपक्रम पुर्णत: लोक सहभागातुन चालतो. हा उपक्रम जनसहभागातुन सुरू आहे. तरी दानशूरांनी यात सहभागी व्हावे असे अवाहन संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे यांनी केले आहे

आतापर्यंत एकुण 61 विद्यार्थ्यांना एकुण रू. 35,30,000/- एवढी मदत 

44 विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण झालेले असुन 17 विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी मदत देण्यात येते. या वर्षी पुर्वीचे 13 व नवीन 5 अशा एकुण 18 विद्यार्थ्यांना 4,45,000/- रू. ची मदत करण्यात आली. आज मदत दिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण संपेपर्यंत प्रतीवर्षी मदत देण्यात येईल.
या वर्षी श्री.नारायणदादा काळदाते उच्चशिक्षण सहाय्यता निधी साठी निवड केलेले विद्यार्थ्यांची माहिती खालील प्रमाणे:-

चि.राख वैभव दिलीप :-
वैभव दिलीप राख हा होळ ता.केज जि.बीड येथील विद्यार्थी असुन तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर येथे एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील होळ या गावात टेलरिंग काम करतात. त्याला मदतीचा पहिला हप्ता रू.30,000 देण्यात आला आहे.

चि.प्रविण बालासाहेब घोरपडे:-
चि.प्रविण बालासाहेब घोरपडे या विद्यार्थ्याला स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे प्रवेश मिळाला आहे. त्याचे वडील शेतमजुर आहेत. हा पाटोदा ता.अंबाजोगाई जि.बीड चा रहीवासी असुन त्याला मदतीचा पहिला हप्ता 20,000/- रू. देण्यात आला आहे.

चि.गवळी सुरज सुंदर :-
सुरज सुंदर गवळी हा विद्यार्थी पाटोदा ता.अंबाजोगाई जि.बीड येथील असुन त्याचे वडील अल्प भुधारक शेतकरी आहेत. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्रवेश मिळाला आहे. त्याला मदतीचा पहिला हप्ता 20,000/- रू. देण्यात आला आहे.

चि.देशमुख यशवंत बिभिषण:-
चि.देशमुख यशवंत बिभिषण हा अंबाजोगाई येथील विद्यार्थी असुन त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपुर येथे प्रवेश मिळाला आहे. त्याचे वडील समोसा विक्रीचा छोटा व्यवसाय करतात. त्याला मदतीचा पहिला हप्ता 30,000/- रू.देण्यात आला आहे.

 

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!