केज

घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांची भेट

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात तुझ्या मुलीचे माझ्या सोबत लग्न का लावून देत नाहीस? या कारणावरून एका तरुणाने त्या मुलीच्या वडीलाचा पाठलाग करून डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्या घटनास्थळी अंबाजोगाई विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी भेट दिली.

या बाबतची माहिती अशी की, दि. ९ एप्रिल शनिवार रोजी दुपारी ३:०० वा च्या दरम्यान केज कळंब रोडवर संत सेना महाराज मंदिरा जवळ सानेगुरुजी निवासी विद्यालयातील सेवक रमेश नेहरकर याचा भागवत चाटे व त्याच्या दोन साथीदारांनी पाठलाग करून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड डोक्यात मारला होता. त्यात रमेश नेहरकर यांच्यावर लातूर येथे एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याचा दि. ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. मारेकऱ्याला तात्काळ अटक करा म्हणून मयताच्या संतप्त नातेवाईकांनी त्याचा मृतदेह केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठिय्या दिला होता. त्या घटनास्थळी दि. १२ एप्रिल रोजी अंबाजोगाई विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी भेट दिली. त्यांच्या सोबत तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे देखील उपस्थित होते. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना तपासा संदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!