पाटोदा

ग्रामस्थांच्या एकमताला अ‍ॅड. कवठेकरांचे आर्थिक बळ

दिलेला शब्द पाळत निभावले सामाजिक उत्तरदायि

पाटोदा/ प्रतिनिधी:
निवडणुकीवेळी ग्रामस्थांनी रस्ता करुन देण्याची मागणी केली. ती पूर्ण करुन देण्याचा शब्द दिला मात्र शेतकर्‍यांची संमती नसल्याने रस्ता होवू शकला नाही. तब्बल चार वर्षानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत शेतकर्‍यांच्या संमतीतून सदर रस्त्याचे काम केले. परंतू जि.प.सदस्य अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांनी लोकांना वर्गणी जमा करु न देता झालेला सर्व खर्च आपण करणार असल्याचे सांगत दिलेला शब्द पुर्ण करत सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे.

डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातील जाधववाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भराटवाडीला आजतागयात रस्ता नव्हता. जि.प. निवडणुकीवेळी ग्रामस्थांनी अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांच्याकडे रस्ता पुर्ण करुन देण्याची मागणी केली होती. सदर रस्ता हा राज्य शासनाच्या यादीत नसल्याने शासकीय निधीतून हा रस्ता करणे कठीण असतांनाही स्वखर्चातून आपण रस्ता प्रश्न मार्गी लावून देवू असा शब्द निवडणुकीच्या वेळी दिला होता. निवडणुकीनंतर अर्धवट रस्ता झाला, परंतू काही शेतकर्‍यांची संमती नसल्याने गावाजवळच रस्ता होवू शकला नाही. हा रस्ता व्हावा यासाठी आ. धस आण्णा यांच्यासह जि.प. सदस्य प्रकाश कवठेकर यांनीही संबंधित शेतकर्‍यांची समजूत काढून रस्ता पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शेतकर्‍यांची संमती न मिळाल्याने गेल्या चार वर्षापासून हा रस्ता प्रश्न रखडलेला होता. यावर्षी शेतकर्‍यांनी संमती दिल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत सदर रस्त्याचे काम केले. परंतू सदर काम लोकसहभागातून सुरु असतांना काही जेष्ठ नागरिकांनी अ‍ॅड. कवठेकर यांना कल्पना दिली. रविवारी (दि.20) अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांनी भराटवाडी येथे जावून सरपंच व ग्रामस्थांची भेट घेतली. तसेच या रस्ता कामासाठी आ. धस आण्णा व मी दोघांनीही शब्द दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही लोकवर्गणी जमा करु नका मी
सदर कामाचा खर्च देतो अशी भुमिका घेत सामाजिक उत्तरदायित्व निभावले. तसेच सदर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठीही लोकनेते आ. सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रयत्नशिल असल्याचे अ‍ॅड. कवठेकर म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे, सरपंच नामदेव जाधव,अण्णासाहेब भराटे, भागवत भराटे, मुरलीधर भराटे, बाबासाहेब भराटे , हरिभाऊ भराटे, केशव थोरवे, नारायण महाराज थोरवे, आजिनाथ थोरवे, कांतीलाल भराटे, विष्णू भराटे, बबन भराटे सह गावातील ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.

     ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान

हल्ली निवडणूक झाल्यानंतर मतदारांना विसरणारे राजकारणी असतांना निवडणुकीपुर्वी दिलेल्या शब्दांची जाण ठेवून तो पुर्ण करणार्‍या अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांच्या कामाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांच्या याच लोकाभिमुख कार्यामुळे ते लोकप्रीय झाले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!