केजक्राईम डायरी

गाईने शेळीला मारले म्हणून शेळीच्या मालकाने गाईच्या मालकाला हाणले !

गौतम बचुटे/केज :- भांडण झालं गाईचं अन्न शेळीचं ! त्या नंतर दोन्ही जनावरांच्या भांडणा वरून त्यांच्या मालकात हाणामारी झाली.

या बाबतची माहिती अशी की, दि.२७ जानेवारी रोजी अशोक तुकाराम जाधव यांच्या गाईने बिस्मिल्ला शेख यांच्या शेळीला मारले. त्याचा राग शेळीच्या मालकाला आला. त्या वरून बिस्मिल्ला शेख व असद दस्तगिर शेख याने रात्री ७:४५ वा. भांडण झाले. भांडणात असद दस्तगिर शेख याने अशोक तुकाराम जाधव याला काठीने मारून जखमी केले. तसेच बिस्मिल्ला शेख व असद दस्तगिर शेख या दोघांनी अशोक तुकाराम जाधव याला संगमनंत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

अशोक तुकाराम जाधव यांनी दि. २८ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात बिस्मिल्ला शेख व असद दस्तगिर शेख या दोघा विरुद्ध गु.र.नं. २४/२०२२ भा.दं.वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अभिमान भालेराव हे पुढील तपास करीत आहेत

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!