गौतम बचुटे/केज : संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे सोशल मीडियावर स्टेटस का ठेवतोस? असे जाब विचारत एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला चौघांनी बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यात घडली आहे.

नाव्होली येथील १७ वर्षीय चैतन्य प्रशांत देशमुख हा नांदूरघाट येथील जीवन प्रगती महाविद्यालयात ११ वीत शिकतो. दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता तो कॉलेजसमोर पाणी पीत असताना प्रताप मोराळे, रुतुराज ढाकणे, प्रकाश तांदळे, दिग्विजय मोराळे हे चौघे आले.”तू जरांगे पाटलाचे स्टेटस का ठेवतोस?” असे विचारताच चैतन्य म्हणाला “मला आवडते म्हणून ठेवतो.” याचा राग येऊन चौघांनी त्याला बेल्टने, लाकडी काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.त्यानंतर १०:४५ वाजता तळ्याची आई मंदिराजवळ पुन्हा अडवून “यापुढे स्टेटस ठेवलास तर तुला व तुझ्या घरच्यांना कापून टाकू” अशी धमकी दिली. मित्र सोडवायला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

गुन्हा दाखल:
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६५२/२०२६, कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर तपास करीत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...