अंबाजोगाईक्राईम डायरी
महिलेची जाळून घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई: आजाराने त्रस्त झालेल्या एका ४२ वर्षीय महिलेने राहत्या घरी स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील खडकपुरा भागात गुरुवारी ( दि. १०) घडली.
सुरेखा संदेश लोमटे (वय ४४, रा. खडकपूरा, अंबाजोगाई) असे त्या महिलेचे नाव आहे.
सुरेखा लोमटे या तीन चे चार वर्षापासून आजाराने त्रस्त होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी गुरुवारी सायंकाळी घरी कोणी नसताना स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली.