गेवराई

शेतकऱ्यांनी आपला माल शासकीय खरेदी केंद्रावरच विक्री साठी आणावा-विजयसिंह पंडित

गेवराई खरेदी विक्री संघामार्फत ज्वारी आणि हरभरा खरेदी सुरु

गेवराई/ प्रतिनिधी:
गेवराई तालुका खरेदी विक्री संघामार्फत ज्वारी आणि हरभरा खरेदी सुरु करण्यात आली असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला माल शासकीय खरेदी केंद्रावरच विक्री साठी आणावा जेणे करून मालाला चांगली किंमत मिळेल असे प्रतिपादन माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. गेवराई येथील शासकीय गोडाऊन येथे ज्वारी आणि हरभरा खरेदीचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई तालुका खरेदी-विक्री संघामार्फत शासकीय गोडाऊन येथे ज्वारी व हरभरा खरेदीचा शुभारंभ आज २२ जून रोजी जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष तथा जि. प.सदस्य फुलचंद बोरकर, नायब तहसिलदार रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजयसिंह पंडित म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय आतापर्यंत झाले आहेत. शेतमालाला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी शासनाने पुर्ण तयारी केली असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रावरच विक्री साठी माल आणावा. ज्वारीची खरेदी शासकीय गोडाऊन येथे तर हरभरा खरेदी-विक्री संघ गेवराई येथे खरेदी करण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी श्रीराम आरगडे, रमेश खोपडे, राजेंद्र जगताप, गोपाळ तौर, शेख अनिसभाई, दयानंद पाडुळे,
दत्ता दाभाडे, अक्षय पवार, संदिप मडके, वैजिनाथ टकले, जगदिस मराठे, श्याम रुकर, वसीम फारोकी, शेख शाहरुख, सरवर पठाण, गोरख चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे सचिव गरड यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!