केज

पावनधाम संस्थान हे ज्ञानपीठ आहे:-ज्ञानेश्वर महाराज कदम

केज/प्रतिनिधी:  तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे बीजोत्सवाच्या सप्ताह सोहळ्यातील किर्तन मालिकेतील तिसरे पुष्प विनताना ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणाले की,

पंढरपूरच्या पालखी मार्गावर पांडुरंगाच्या कृपेने जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल- रुक्मिणी मंदिराची उभारणी म्हणजे धाकले पंढरपूर आणि प्रतिदेहू वाटते. पुढे बोलताना ते म्हणाले, पंढरपूरच्या पालखी मार्गावर हे स्थान असल्यामुळे पंढरपूर ला जाणारे सर्व पालखी सोहळे येथे विसावतात. देहूकर परंपरेचा शिक्का मोर्तब असलेल हे महाराष्ट्रातील पहीलच प्रतिदेहू आहे.
यावेळी महंत महादेव महाराज बोराडे,अमोल महाराज,अशोक महाराज,जनार्धन महाराज चलवाड, हनुमंत महाराज सिरसाट,दिलीप शिंदे,भागवत शिंदे,सुदाम पाटील,पंडित सावंत,सौदागर कदम,सुर्यकांत नांदूरे ,फुलचंद काकडे,शंकर उबाळे,अरूण काळे,गणेश महाराज भगत,प्रशांत निगडे,सचिन पतंगे,उमेश करपे,केशव धनगरे, न्यूज वन महाराष्ट्र चॅनलचे मुलाखतकार संतोष रोकडे यांच्यासह पंचक्रोशीततील भाविक उपस्थित होते

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!