बीड

तृतीय पंथीयांना किराणा किटचे वाटप

समता प्रतिष्ठाणचा उपक्रम

बीड / प्रतिनिधी :
येथील समता प्रतिष्ठान मार्फत शहरातील 20 तृतीय पंथीयांना किराणा किटची मदत करण्यात आली. कोरोना महामारीमुळे मागील अडीच महिन्यांपासून त्यांचे काम बंद असल्याने परिस्थिति बिकट झाली होती.

समताच्या कार्यकर्त्यांंनी समाजातील सामाजिक बांधिलकी मानणार्‍या लोकांच्या लोकसहभागातून मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत समताकडे देणगी गोळा झाली. त्यातुन नाळवंडी नाका परिसरात राहणार्‍या 20 तृतीय पंथीय राहतात त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन ही किराणा किटची मदत देण्यात आली. ही किराणा किटची मदत म्हणजे फार मोठी मदत नाही, किंवा फार दिवस पुरणारी नाही, पण त्यानिमित्ताने आम्ही प्रेमाने त्यांची विचारपूस केली, माणूस म्हणून त्यांचा विचार केला. स्वतः होऊन महिला त्यांना भेटायला गेल्या. आमच्या डोळ्यातील त्यांच्या साठीचे सन्मान आपुलकी, आस्था यामुळे त्यांना भरून आले. आज पहिल्यांदाच आमची कोणी तरी आस्थेने विचारपूस करत आहे. आमच्या अस्तित्वाची दाखल घेत आहे. त्यामुळे या जगात आमचेही कोणीतरी आहे, असे आम्हाला वाटत आहे. या शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला.
राहायला घर नाही, जन्मदाते, सक्खे नातेवाईकही विचारत नाहीत. शिक्षण नाही, कोणतेही कागदपत्र, ओळखपत्र नाहीत, शासकीय योजनांचा लाभ नाही, सामाजिक हेटाळणी, अवहेलना असे एक न असंख्य जीवघेण्या समस्यांना तोंड देत हे लोक जगत आहेत. हा बहिष्कृत, तिरस्कृत आणि दुर्लक्षित समाज. त्यांनी कोणतीच चुक केलेली नाही, निसर्गाने दिलेले शरीर आणि मन आहे. त्याची ते शिक्षा भोगत आहेत.
आपण समाजाने या तृतीय पंथीय समाजाचा माणुस म्हणुन स्विकार केला पाहिजे. शासनाने त्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता, सोयी सवलती, शैक्षणिक सवलती दिल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचे जगणे सुसह्य होईल ही अपेक्षा या समाजघटकाने आणि समता कार्यकर्त्यांनीही यावेळी व्यक्त के

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!