अंबाजोगाईजिल्ह्याचं राजकारण

किसान काँग्रेसचा खा.राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प

अंबाजोगाई/प्रतिनिधी:

किसान काँग्रेसने नेते खा.राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प केला आहे.खा.गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेच्या विविध प्रश्नांवर किसान काँग्रेसच्या वतीने १९ जून,शनिवार रोजी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयांसमोर आंदोलन करून संकल्प दिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य तथा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य तथा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संकल्प दिन पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, इंधन दरवाढ, काळे कृषि कायदे,बेरोजगारी यासह सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित मुद्यांवर दिल्लीतील भाजपाच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निष्क्रीय कारभारात विरोधात घोषणा देवून, निषेधाचे फलक झळकावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य तथा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव,काँग्रेसचे राज्य समन्वयक संजय वाघमारे,माजी तालुकाध्यक्ष ॲड.अनंतराव जगतकर,माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे, माजी शहराध्यक्ष तारेख अली उस्मानी, माजी नगरसेविका बिलकीस कच्छी,युवक काँग्रेस परळी विधानसभेचे ईश्वर शिंदे,किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष धनराज कोळगिरे, तालुकाउपाध्यक्ष सतिश भगत, योगेश तट, अच्युतराव इंगळे, नागनाथ इंगळे, सिध्देश्वर स्वामी, भीमराज मोरे, शरद वाघमारे, उध्दवराव गंगणे आदींसह किसान काँग्रेस, काँग्रेस पक्ष कार्यकर्ते,पदाधिकारी सहभागी झाले होते. या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य तथा अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव म्हणाले की,काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांचा आज १२ जून रोजी वाढदिवस आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले यांचे आदेशानुसार किसान काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी वाढदिवस हा ‘संकल्प दिन’ म्हणून राज्यासह संपूर्ण मराठवाड्यात साजरा केला जात आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!