अंबाजोगाईफिचर

आपेगावच्या किशोरी मुर्के हिला ‘आयसीएमए’ची शिष्यवृत्ती

गायक महेश काळे देणार किशोरीला शास्त्रीय संगीताचे धडे

अंबाजोगाई / प्रतिनिधी:
कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तालुक्यातील आपेगाव येथील रहीवासी व हल्ली लातुर येथे राहणारी गायिका किशोरी मुर्के हिला इंडियन क्लासिकल म्युझिक अॅण्ड आर्टस फाउंडेशनच्या (आयसीएमए) वतीने शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

किशोरी सध्या लातुर येथील दयानंद कला महाविद्यालयात बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिला तिचे वडील व जयकिसान विद्यालय आपेगाव येथील संगीत शिक्षक सुरमणी भुजंग मुर्के यांच्याकडून संगीताचे धडे मिळाले आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियालिटी शोमध्ये किशोरीची निवड झाली होती. तिने आपल्या मधुर आवाजात शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी सादर करून संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले होते. शास्त्रीय संगीताचा झेंडा सातासमुद्रापलीकडे घेऊन जाणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक पं. महेश काळे हे किशोरी मुर्के हिचे गायन ऐकून भारावून गेले. तिला त्यांनी सॅनफ्रॅन्सिस्कोस्थित इंडियन क्लासिकल मुसिक अॅण्ड आर्ट्स फाउंडेशनची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. तिच्या यशाबद्दल माजी शिक्षण व आरोग्य सभापजी राजेसाहेब देशमुख, पं. स. सदस्य तानाजी देशमुख, संस्थेचे सचिव जयजितबापू शिंदे, मुख्याध्यापक राम नागीशे, पर्यवेक्षीका सौ. व्हि. जे. शिंदे, गावच्या सरपंच सौ. प्रियंका निलेश शिंदे यांच्यासह शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी किशोरी मुर्के हिचे कौतुक केले आहे.

      प्रतिमहा दहा हजार रूपये 

या माध्यमातून तिला प्रतिमहा दहा हजार रुपये आणि पं. महेश काळे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे मिळणार आहेत. ही शिष्यवृत्ती तिला शास्त्रीय संगीताचे शिक्षणघेईपर्यंत मिळणार आहे. आतापर्यंत केवळ दोघांनाही शिष्यवृत्ती मिळाली आहे.

महाविद्यालयात सन्मान

किशोरी मुर्के ही सध्या लातुर येथील दयानंद कला महाविद्यालयात बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य अनिल कुमार माळी, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीप जगदाळे, भुजंग मुर्के, प्रा. शरद पाडे, कार्यालय अधीक्षक नवनाथ भालेराव आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!