अंबाजोगाईक्राईम डायरी
कोळकानडी येथे घरफोडी

अंबाजोगाई: तालुक्यातील कोळकानडी येथे घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक ५ रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कोळकानडी येथील शिवरुद्र मन्नमथ आकुसकर हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराचे चायनल गेटचे कुलूप तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश करीत कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शिवरुद्र आकुसकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.