पाटोदा

महंत राधाताई महाराजांनी पुढाकार घेवुन कोमलच्या लग्नाचा सुयोग जुळवुन केले कन्यादान!

पाटोदा/ अजीज शेख
घरची अत्यंत गरीबी व आई- वडीलांची मजुरीसाठी भटकंती सुरु असणाऱ्या कोमल माने या मुलीचे लग्न कसे होणार याची सर्वानाच चिंता होती. मात्र आध्यात्माच्या साक्षीने तिची रेषीमगाठ जुळली असुन या विवाहासाठी तालुक्यातील श्री क्षेत्र मीराबाई संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांनी संपुर्ण पुढाकार घेत हा सुयोग जुळवुन आणला.

कोमल रविंद्र माने ही मुळची म्हात्रेवाडी ता.भुम, जि.उस्मानाबाद येथील रहीवासी, घरची परीस्थिती अत्यंत बिकट त्यामुळे आई- वडील मजुरीच्या शोधार्थ सातत्याने भटकंती करीत, त्यातच कोमल च्या शिक्षणची ससेहोलपट थांबावी म्हणुन त्यांनी पाच वर्षापुर्वी श्री क्षेत्र मीराबाई संस्थानच्या मठाधिपती महंत राधाताई महाराज यांची संस्थान वर जावुन भेट घेतली व त्यांना आपली व्यथा सांगितली यावर राधाताई महाराज यांनी तात्काळ आम्ही सर्व तुमच्या कुटुंबातीलच आहोत असे सांगत त्यांना धीर दिला. कोमलला संस्थान वर ठेवुन घेत तिच्या शिक्षणासह संपुर्ण जबाबदारी घेतली व तिच्या आई वडीलांना कोमल चे लग्नही आम्ही आजच याच संस्थानवर लावु आणि कन्यादानही मी स्वतः करेन असे त्यांना आश्वस्त केले. ससेहोलपट सुरु असलेल्या कोमलला क्षणातच आधार मिळाला,कुटुंब मिळाले, यानंतर तिचे पदवीपर्यंचे शिक्षणही याच ठिकाणी पुर्ण झाले. महंत राधाताई महाराज यांच्या पुढाकारातुन तिचे श्रीगोंदा कारखाना येथील रहीवासी असलेल्या मच्छिद्र शेळके या व्यवसायाने औषधी दुकानदार असलेल्या तरूणाशी जुळले. शुक्रवारी या छोटेखानी विवाह सोहळ्याची तयारी ही झाली व श्री क्षेत्र मीराबाई संस्थानच्या परीसरात सोशल डिस्टसिंग मास्कचा वापर व सर्व कोरोना नियमांचे पालन करुन मोजक्या १५ व-हाडींच्या उपस्थितीत हे आदर्श मंगलकार्य पार पडले,महंत राधाताई महाराज यांनी स्वतः कोमलचे कन्यादान करून एक नवा व प्रेरणादायी पायंडा पाडला व तिचा संपुर्ण संसार उभा करुन दिला,या वेळी जेष्ठ नेत्या सत्यभामा बांगर, पाटोदा पोलीस ठाण्याचे ए.पी.आय.महेश आंधळे व नगरपंचायत अभियंता किरणकुमार देशमुख यांनीही वधु- वरांना संसारोपयोगी भेटवस्तुंचा आहेर करुन पुढाकार घेतला, तर ह.भ.प.रामकृष्ण रंधवे बापु महाराज,विठ्ठल महाराज सांगळे,माताजी कुसुम सानप यांनी वधु वरास शुभार्शिवाद दिले.या वेळी पाेलीस कर्मचारी बळीराम कातखडे, महेश बेदरे,स्वामी सानप, किसनदेव सानप,राधेशाम जाधव,शिवाजी गर्ज, गोकुळ जाधव आदी उपस्थित होते.

नवा आदर्श
या विवाहासाठी सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रशासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून केवळ १५ वन्हाडींच्या उपस्थितीत आदर्श ठरेल अशा छोटेखानी सोहळ्यात कोमल व मचिंछद्र यांनी जन्मोजनमीची खुणगाठ बांधली. या वेळी महंत राधाताई महाराज यांनी कोमल चे स्वतः कन्यादान करुन त्यांचा संपुर्ण संसार उभा केला व एक नवा आदर्श उभा केला.

“आमच्या संस्थानवर आम्ही आत्तापर्यंत २५ च्या वर अनाथ व गरीब मुलींचा सांभाळ करून त्यांना शिक्षणाची सोय केली आहे व अध्यात्मातही रंजल्या गांजल्या व गरीबांची सेवा करणे असाच संदेश असुन इश्वराच्या संदेशाचे आचरण करण्याचेच आम्ही कार्य करत आहेत,या जगात कोणीच अनाथ नसुन इश्वरच त्यांचा पाठीराखा आहे.कन्यादानाचे पुण्य सर्वात मोठे आहे व ते कोमलमुळे आम्हाला मिळाले याचाच आनंद आहे.”

-महंत राधाताई महाराज

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!