पंकज कुमावत यांची केज येथे मटक्याच्या मालका विरुद्ध मोठी कारवाई
मटका चालकासह १२ जण ताब्यात तर ५० मटका बुक्की एजंटवर गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आता केजमध्ये सुरू असलेल्या मटक्या विरुद्ध ठोस व सर्वात मोठी धडक कार्यवाही केली आहे. त्यांनी आता थेट मटका चालका विरुद्ध कार्यवाही करून मटका चालविणारा मालक व त्याच्यासह १२ जणांना ताब्यात घेत एकदाच एकूण ५० जणांच्या विरुद्ध कार्यवाही करून एकूण साडेतीन लाख रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
दि. ३० मार्च रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना केज शिवारामध्ये इंगळे वस्तीवर असलेल्या खोलीत गणेश सुधीर खराडे हा मटक्याचा अवैध धंदा करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ ही माहिती त्यांच्या पथकाला देऊन कारवाई करण्याचा आदेश दिला. आदेश मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, महादेव बहिरवाल, गृहरक्षक दलाचे जवान बिक्कड व शिरसाट यांच्या पथकाने सायंकाळी ४:३० वा. धाड टाकली. या धाडीत त्यांनी थेट मटक्याचा मालक गणेश सुधीर खराडे यांच्यासह त्याला मटक्याच्या पट्ट्यांची छाटणी करून मदत करणारे इब्राहीम ईनामदार, अतुल ढगे, संकेत जाधव, राहुल गुंड, ईस्माईल ईनामदार, अन्वर सय्यद, मधुकर पुरी, प्रमोद सत्वधर, रवि काळे, बळीराम गिराम आणि किशोर भांडे या १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून रोख ३० हजार ४०० रु. आणि टॅब, मोबाईल, ७ मोटार सायकली, मटक्याच्या चिठ्या व साहित्य असा एकूण ३ लाख ४७ हजार ४७० रु. चा मुद्देमाल जप्त केला.
तसेच त्यांची अधिक चौकशी केली असता केज आणि परिसरातील त्यांचे मटका बुक्की चालविणारे एजंट अशोक कदम, संघर्ष हजारे, करण सेठ, बजरंग वरपे, अमर गालफाडे, लखन नखाते, गिरी महाराज, युवराज झाडे, गयबु शेख, अजीज शेख, उदज जाधव, आव्हाड बापू, संतोष शिनगारे, माउली मोरे, शेख महेबुब, शेख शाहेब, आकुसकर, कैलास गिरी, गोविंद इंगळे, खंडु जाधव, बळीराम चाटे, जमीर शेख, पिंटु पाटील, सचिन कोल्हे, संतोष शिंदे, आण्णा मैंदाड, चाँद शेख, नारायण तांदळे, अशोक, मुकरम सय्यद, रोडे आण्णा, रोहन, गुजर, सुनिल, पप्पू जाधव, अखील नसीर अशा एकूण ५० जणांच्या विरुद्ध पोलीस नाईक अनिल मंदे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पंकज कुमावत यांच्या पथकाने केज येथील मटका आणि मटका रॅकेट यांचे कंबरडे मोडण्यासाठी केलेल्या मोठया कारवाईमुळे अवैद्य धंद्यावाले धास्तावले आहेत.