केजक्राईम डायरी

कत्तल खान्याकडे जाणारा जनावरांचा ट्रक पंकज कुमावत यांनी मांजरसुंब्यात पकडला

गौतम बचुटे/केज:- जामखेडहून कत्तलीसाठी बीड येथे कत्तल करण्यासाठी जनावरांनी भरलेला टेम्पो सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने पकडला.

दि. ११ जून रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, जामखेड येथून आयशर टेम्पो क्र.(एम एच १२/एच डी ०४२१) मध्ये बेकायदेशीररित्या गायी, बैल व वासरे भरून त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्यासाठी मांजरसुंबा मार्गे मोमीनपुरा बीड येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात आहेत. अशी माहिती मिळताच पंकज कुमावत यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, रामहरी भांडणे, सचिन अहंकारे यांच्या पथकाने सदरचा आयशर टेम्पो क्रमांक क्र.(एम एच-१२/एच डी-०४२१) दि. ११ जून शनिवार रोजी सायंकाळी ७:०० वा. मांजरसुंबा चौकातील हाय-वे पोलीस चौकी समोर अडवून चौकशी केली. चालकाने त्याचे नाव शेख अरबाज शेख कट्टू व शहाबाज इजाज कुरेशी दोघे रा. मोमीनपुरा बीड असे सांगितले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना सदर टेम्पो मधील जनावरे या बाबत विचारपूस करून कागदपत्रे विचारले असता व जनावराचे दाखले व वाहतूक करण्याचा परवाना विचारले असता त्यांच्याकडे कोणताही परवाना आढळून आला नाही. सदरची जनावरे मोमीनपुरा बीड येथील व्यापारी मोबीन कुरेशी यांची असून त्यांच्या सांगण्या वरून जामखेड येथे भरून मोमीनपुरा बीड येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन नेकनूर पोलीस ठाण्यात जनावरे खाली उतरली. त्यात दोन बैल, अकरा गाई व पाच वासरे अशी १८ जनावरे होती. त्यांची किंमत ३ लाख २५ हजार रु. आणि टेम्पोची किंमत ४ लाख ५० हजार रुपये असा एकूण ७ लाख ७५ हजार ताब्यात घेतला. तीन आरोपीविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात ११(१) (डी), ११(१) (ई) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनीयम २९६० कलम ५ (ए) (१), ५ (ए) (२), ५ (बी) १२ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधीनीयम कलम १९७६, ६६/१९२ मोटार वाहन कायदा १९८८ कलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!