बीड
द कुटे ग्रुपच्या गुड मॉर्निंग प्रॉडक्ट्सचे लॉंचिंग

बीड/ प्रतिनिधी
येथील तिरुमला ग्रुप आजवर एडिबल ऑइल क्षेत्रात कार्यरत होता. रविवारी ( दि. १२) द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे ,अर्चना कुटे, राधाकाकू कुटे , आर्यन कुटे ,यशवंत कुलकर्णी , डॉ. पद्माकर पाटोदेकर, आशिष पाटोदेकर, आशाताई पाटील पाटोदेकर, डॉ. फुलझळके यांच्यासह माध्यम क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते गुड मॉर्निंग डेअरी प्रॉडक्ट्सचे लॉंचिंग करण्यात आले .
यावेळी गुड मॉर्निंग गाईचे दूध , दही,तूप ताक,पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचे थाटात लॉंचिंग करण्यात आले .बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कुटे ग्रुपच्या डेअरी प्रॉडक्ट्सच्या ब्रँड अंबेसिडर आहेत .शिल्पा शेट्टी यांनी केलेल्या कुटे ग्रुपच्या दुग्धजन्य पदार्थांची “अब हर दिन की शुरूवात गुड मॉर्निग कुटे ग्रुप के काऊ दूध के साथ ” अशी केलेली जाहिरात ही यावेळी लॉन्च करण्यात आली .