क्रीडा
भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा महिला संघ जाहीर
ब्रिस्टल: भारताविरुद्ध १६ जूनपासून सुरू होत असलेल्या एकमेव कसोटीसाठी इंग्लंडच्या महिला संघाची बुधवारी घोषणा करण्यात आली. संघात वेगवान गोलंदाज एमिली अरलॉटचे पुनरागमन झाले आहे. इंग्लंड संघात १७ सदस्यांचा समावेश आहे. हीथर नाइट भारताविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल, तिने सात वर्षांपूर्वी आपली कसोटी लढत खेळली होती. मुख्य प्रशिक्षक लिसा केइटली यांनी म्हटले की,‘आम्ही खेळाडूंना खेळण्याची जास्तीत जास्त संधी देऊ इच्छितो’ संघ : हिथर नाइट (कर्णधार), एमिली अरलॉट, टॅमी ब्युमोंटे, कॅथरीन ब्रंटे, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, टॅश फारंट, सारा ग्लेन, एमी जोन्स, नेट सायवर, श्रुबसोल, मॅडी विलियर्स, फ्रॅन विल्सन, लॉरेन विनफील्ड-हिल.