केज

केज अंबाजोगाई रोडवर शिक्षिका ठार

केज / प्रतिनिधी
केज – अंबाजोगाई रोडवर असलेल्या भाटू्ंबा फाट्याजवळ टेम्पोने मागून मोटरसायकलला दिलेल्या धडकेत शिक्षिका अश्वीनी अशोक धपाटे ( वय ५१ ) जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती अशोक धपाटे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी( दि. ११ ) सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडला.

तालुक्यातील भाटूंबा येथील मूळ रहिवाशी व हल्ली उमरी रोड केज येथे राहत असलेले अशोक धपाटे व त्यांची पत्नी अश्वीनी धपाटे हे आपल्या मोटरसायकल वरून (एम.एच. 23 जे 9916) केज कडे येत होते. यावेळी केज मुख्य रस्त्याला त्यांची मोटरसायकल लागल्यानंतर अंबाजोगाई कडून येणाऱ्या टेम्पोने ( एम. एच. 17 एजी 1459) त्यांच्या मोटरसायकलीस पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक खूप जोराची असल्याने पाठीमागे बसलेल्या अश्विनी धपाटे या जागीच ठार झाल्या तर अशोक धपाटे हे गंभीर जखमी झाले आहेत. मयत अश्विनी धपाटे या कुंबेफळ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गंभीर जखमी झालेले अशोक धपाटे यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!