केजक्राईम डायरी
लाखा येथून ट्रॅक्टरच्या नांगराची चोरी

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील लाखा येथून ट्रॅक्टरच्या नांगर अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, लाखा ता. केज येथील संजय नरहरी घाडगे रा. लाखा ता. केज यांचा लाखा शिवारातील सर्व्हे नंबर ३१(१), बोडखी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात त्यांनी ठेवलेला जयकीसान कंपनीचा जुना ४५ एच पी चा ट्रॅक्टरचा नांगर दि, १७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यानी चोरून नेला आहे. त्यानी नांगराचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. म्हणून संजय नरहरी घाडगे यांनी दि. २८ जानेवारी रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्या नुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.नं. २३/२०२२ भा.दं.वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.