अंबाजोगाईक्राईम डायरी

अभिलेखात अफरातफर करून जमीन हडपली; सहा जणांवर पोलिसात गुन्हा दाखल

अंबाजोगाई:  जमीन हडप करण्याच्या उद्देशाने महसूल अभिलेखात अफरातफर करून खोट्या फेरफार नोंदीच्या आधारे जमीन हडप केल्याप्रकरणी सहा जणांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बर्दापूर येथील शेख खलील शेख दस्तगीर यांच्या मालकीची जमीन गट क्रमांक ४४९ मध्ये आहे. ती हडप करण्याच्या उद्देशाने आरोपींनी महसूल अभिलेखात अफरातफर करून खोट्या फेरफार नोंदीच्या आधारे खोटे दस्तावेज बनवले व कोणालाही माहिती होऊ न देता अंधारात ठेवून सदर खोटे दस्त नोंदवून घेतले. सदरची दोन्ही दस्त खोटी आहे हे माहीत असताना देखील काही आरोपींनी त्यावर साक्षीदार म्हणून सह्या केल्या व फसवणूक केली. या प्रकरणी शेख खलील शेख दस्तगीर यांच्या फिर्यादीवरून नंदकिशोर दगडुला लड्डा, शोभा वसंत शिनगारे, वसंत मारोती शिनगारे, बालाजी मारूती खैरमोडे, बालाजी मारुती यादव, शेख मुसा शेख रशीद यांच्याविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस जमादार बारगजे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!