धारुर

धारूर-आडस रस्तावर मोठे-माठे खड्डे; वाहनधारकांची होतेय गैरसोय

आडस/प्रतिनिधी
आडस येथून जात असलेला धारूर ते अंबाजोगाई या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. माजलगाव बीड वरून येणारे वाहने मोठ्या प्रमाणात अंबाजोगाईला जातात. पण धारूर ते आडस मार्गावर मोठे खड्डे झाल्याने वाहतुकीचा मोठी अडचण येत आहे. या कड्याकडे बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे . तरी लवकरात लवकर खड्डे बुजवून होणारा त्रास कमी करावा अशी मागणी परीसरातील नागरीकांतून होत आहे.
अंबाजोगाई ते धारुर येथे जाण्यासाठी आडस मार्गे जावे लागते. परंतू हा रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत तसेच सध्या खरीप हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी ही या खड्ड्यांमुळे मोठी अडचण येत आहे. कारण काही दिवसा खालीच बांधकाम विभागाने खड्डे भरून घेण्यात आले होते . पण कामाचा दर्जा चांगला नसल्याने पुन्हा खड्डे होऊन वाहनधारकांना मोठी अडचण येत आहे. तरी लवकरात लवकर खड्डे भरून नागरिकांची व वाहनधारकांची अडचण दूर करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
रुग्णांचे होतात हाल
धारूर शहरातून व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अंबाजोगाईला आडस मार्गे वाहनांचे दळणवळा आहे. दवाखान्यासाठी धारूर शहरातून व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी जातात त्यामध्ये गरोदर महिला लहान बालक यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अंबाजोगाई मध्ये तज्ञ डॉक्टर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तालुक्यातील इतर तालुक्यातील आडस मार्गे नागरिक जातात, पण जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठी अडचण येत असून यामुळे वाहनांमधील रुग्णाचे मोठे हाल होत आहेत. यामुळे धारूर ते आडस रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून घ्यावेत किंवा नवा रस्ता तयार करावा अशी मागाणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे. याकडे प्रशसनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
खड्डे भरुन डागडुजी
काही दिवसांपूर्वीच खड्डे भरुन डागडुजी केली होती. काम व्यवस्थित न झाल्याने आणखी नव्याने मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठी अडचण येत आहे. आम्ही सतत अंबाजोगाईला दवाखान्यांमध्ये रुग्ण घेऊन जातो पण या धारूर ते आडस रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास रुग्णांना मोठ्या प्रमाणात होतो. वाहनांचा मेंटेनन्स ही मोठा निघत आहे. तरी लवकरात लवकर खड्डे भरून होणारा त्रास कमी करावा.अशी मागणी वाहनधारक अविनाश जगताप यांनी केली आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!