अंबाजोगाई
मयत वानराचा विधिवत अंत्यसंस्कार

अंबाजोगाई: लाईट चा करंट लागून मयत झालेल्या वानराचा येथील खडकपुरा परिसरातील नागरिकांनी विधिवत अंत्यसंस्कार केला. या वानराचे अंतीम दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शहरातील खडकपुरा भागात कलशेट्टी यांच्या घरावरून वडाच्या झाडावर उडी मारत असताना एका वानराला विजेच्या तारेचा शॉक लागला. जोराचा शॉक लागल्याने या वानराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परिसरातील नागरिकांना कळाल्यानंतर या वानराचा विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे नागरीकांनी ठरवले. यावेळी वानराचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भजनी मंडळाने अंत्यविधीची तयारी होईपर्यंत भजन केले तर महिलांनी रांगोळी काढल्या. या वानराचा अंत्यविधीसाठी नागरिक, महिला लहान मुलासह उपस्थित होते.