क्राईम डायरीगेवराई
जिल्हा परिषदेच्या शाळेतून एलईडी चोरी

गेवराई /प्रतिनिधी
तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एलईडी चोरून नेल्याची घटना १ जून ते ३ जून रोजीच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राक्षसभुवन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या वर्गाचे कुलूप तोडून खोली मध्ये असलेला आकाई कंपनीचा 32 इंची एलइडी (किंमत ८ हजार २०० रुपये) चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक भागवत भाले यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.