केज पोलिसांनी केला देशी दारूचा अड्डा उद्ध्वस्थ

गौतम बचुटे/केज :- केज येथील फलोत्पादन खात्याच्या सरकारी जागेत बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करीत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून देशी दारू ताब्यात घेत देशी दारू अड्डा उध्वस्त केला.
या बाबतची माहिती अशी की, दि. १९ फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी १२:३० वा. केज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर यांच्या पथकातील महिला पोलिस जमादार रुक्मिणी पाचपिंडे, शमीम पाशा, मंगेश भोले, महादेव बहिरवाळ, अनिल मंदे, दिलीप गित्ते, जिवन करवंदे यांनी केज येथील केज-अंबाजोगाई रोड लगतच्या फलोत्पादन खात्याच्या जागेत चालणाऱ्या बेकायदेशीररित्या चालणाऱ्या एका देशी दारू अड्यावर धाड टाकली. यात टँगो पंच, बॉबी संत्रा व असा देशी दारू चा मालक जप्त केला आणि या प्रकरणी भागुबाई बापू काळे रा. क्रांती नगर केज हिच्यावर ६५ (ई) नुसार कार्यवाही करून देशी दारू ताब्यात घेत अड्डा नष्ट केला.