क्राईम डायरीधारुर
दुकान फोडून दारूच्या बाटल्या पळवल्या

आडस/प्रतिनिधी:
येथील देशी दारू व बीयरबारचे दूकाने फोडून चोरट्यांनी देशी, विदेशी दारू चाेरून नेल्याची घटना रविवारी (ता. 14) मध्यरात्री घडली. यावेळी चाेरट्यांनी दारूच्या बाटल्या व नगदी रोख रक्कम असा पंचेवीस हजारांचा माल लंपास केला.
होळ रोडवर कोपले यांचे देशी दारू व हॉटेल श्रीजीत हे बीयर बार आहे. मध्यरात्री दुकानात कोणीही नसल्याची संधी साधून रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बीयरबारचे शटर उचकाऊन तर देशी दारू दुकानाच्या पाठीमागे असलेल्या दरवाज्याचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रोख २ हजार ५०० रूपये आणि दारुचे दोन बॉक्स तर बीयर बार मधील विदेशी दारुचे दोन बॉक्स व रोख रक्कम असा जवळपास २५ हजारांचा माल चोरुन नेला.