अंबाजोगाई

अंबाजोगाईत महिला दिनानिमित्य आत्मरक्षा प्रशिक्षणशिबिर संपन्न

अंबाजोगाई: दि. 8मार्च “जागतिक महिला दिन” निमित्त महिला सशक्तिकरण याचा भाग म्हणून मंगळवारी पोलीस स्टेशन अंबाजोगाई येथे तायक्वोंदो एसोसिएशन ऑफ अंबाजोगाई च्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी सेल्फ डिफेन्सचे प्राक्तेक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पोलिस उपनिरीक्षक सुचिता सिंगाड़े यांची उपस्थिती लाभली.महिला दिनानिमित्य अंबाजोगाई पोलिस स्टेशन शहरी विभाग इथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस यांना आत्मरक्षण प्रशिक्षण मिळावे . तायक्वोंदो एसोसिएशन ऑफ बीड यांच्या अंतर्गत शाखा अंबाजोगाई इथले प्रशिक्षक बालाजी कराड व त्यांच्यासोबत महिला प्रशिक्षिका समीक्षा बनसोडे, दिव्या निर्मल यांनी याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सादर केले .सुचिता सिंगाड़े यांनी या क्षणी महिला सशक्तिकरण चे महत्व सांगुन मार्गदर्शन केले .या उपक्रमास शहरामधील विद्यार्थांनी चांगला प्रतिसाद दिला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!