दरडवाडी येथे चुलत्यावर दाताळ्याने जीवघेणा हल्ला

केज/ प्रतिनिधी
सामाईक विहिरीच्या वादातून चुलत्यावर लोखंडी दाताळ्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना तालुक्यातील दरडवाडी येथे शनिवारी ( दि. १२ ) घडली. यामध्ये चुलता गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी केज पोलीसात चौघांवर दि. १४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील दरडवाडी येथील गुरुलिंग बारीकराव दराडे व गोरख बारीकराव दराडे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या सामाईक विहिरीवरून सामाईक पाईप लाईन केलेली आहे. या पाईपलाईनच्या कारणा वरून अनेक वेळा त्यांच्यात भांडण होत असत. दरम्यान गुरुलिंग दराडे यांनी त्यांचा भाऊ गोरख दराडे आणि पुतण्या श्रीहरी दराडे यास पाईपलाईनचे टोपण का काढलेस? असे विचारल्यावरून गुरुलिंग दराडे यांना त्यांचा शेतातील दाताळ्याने मारहाण केली. तसेच त्यांचा सख्खा भाऊ गोरख दराडे यानेही लोखंडी पाईपणे मारहाण केली आणि सिमा दराडे व सोनाली दराडे यांनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यात गुरुलिंग दराडे यांच्या कपाळावर खोलवर जखम झाली आहे. गुरूसिंग दराडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठा औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. गुरुलिंग दराडे यांचा मुलगा प्रकाश गुरुलिंग दराडे याने दि.14 जून रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार श्रीहरी गोरख दराडे, गोरख बारीकराव दराडे, सिमा गोरख दराडे आणि सोनाली श्रीहरी दराडे यांच्या विरुद्ध गु.र.नं. 292/2021 कलम 307,326,323, 504, आणि 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे हे करीत आहेत.