
अंबाजोगाई/ प्रतिनिधी
खरीप हंगामासाठी मुख्यपीक म्हणुन सोयाबीन चा पेरा मोठ्याप्रमाणावर होतो.मात्र सोयाबीनचे बियाणांची कमतरता मोठया प्रमाणात निर्माण झाली आहे.हि कमतरता दुर करून मुबलक प्रमाणात सोयाबीन चे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या.अशी मागणी आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी एका पत्राद्वारे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.
बीड जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाणे 158,71,335,228 प्रजातीचे बियाणे बाजारात उपलब्ध नाहीत. महाबीजच्या बियाणासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणाता मागणी आहे. दरवर्षी पेक्षा यावर्षी व्यापाऱ्यांनी नोंदणी केली होती त्यापेक्षा खूप कमी बियाणांचा पुरवठा महाबीजने केला आहे. तसेच बिजोत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही त्यांना पूर्ण क्षमतेने महाबीज कडून बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
तरी बीड जिल्ह्यात महाबीज सोयाबीन बियाणे शेतकऱ्यानां पेरणी पूर्वी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. व बिजोत्पादक शेतकऱ्यांनाही नोंदणी प्रमाणे बियाणे उपलब्ध करून द्यावे.अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी केली आ