अंबाजोगाई

रोटरी क्लब व पशुवैद्यकीय दवाखाना ममदापूर यांच्या सयुक्त विद्यमाने लसीकरण

अंबाजोगाई/प्रतिनिधी:

शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणुन पशुपालन व्यवसाय,दूध उत्पादन वाढवावे.असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी केले. येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व पशुवैद्यकीय दवाखाना ममदापूर यांच्या वतीने सातेफळ येथे ९२ जनावरांना घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरण तर १०० शेळ्यांना आंत्रविषार रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पाचेगावकर बोलत होते.

यावेळी सातेफळ गावचे सरपंच वहिद पठाण,अमोल किर्दंत,प्रवीण किर्दंत,संतोष किर्दंत,कांबळे, विकास जाधव,आदी. उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ.पाचेगावकर म्हणाले की शेती ही निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी नफ्यात तर कधी तोट्यात येते.यासाठी जोडधंदा म्हणून पशुपालन करणे गरजेचे आहे. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अनिल केंद्रे यांनी पशुधन कसे जोपासवे. या बद्दल माहिती दिली. या प्रसंगी रोटरीचे सचिव कल्याण काळे, डॉ.अनिल केंद्रे,शकील शेख,अजित देशमुख,संतोष मोहिते,स्वप्नील परदेशी उपस्थित होते. या वेळी लसीकरणासाठी डॉ.अनिल केंद्रे यांना प्रमोद सोनवणे,अमोल लष्करी,आकाश दोडतले यांनी सहकार्य केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती मधून उत्पन्न मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्याच जाेडीला पशु पालन सुरू केल्यास शेतकऱ्यांनी अार्थिक उन्नतीचा चांगला मार्ग उपलब्ध हाेईूल, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे अावश्यक असल्याचे यावेळी डॉ.पाचेगावकर यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!