अंबाजोगाईक्राईम डायरी

चाडी का लावता असे विचारल्याने बेदम मारहाण

अंबाजोगाई /प्रतिनिधी
शेजाऱ्याजवळ चाडी का लावता असे विचारण्याच्या  कारणावरून तालुक्यातील भावठाणा येथील एकास बेदम मारहाण झाल्याची घटना रविवारी घडली याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील भावठाणा येथील रहिवासी असलेले बिल्किस युसुफ शेख यांनी शेजाऱ्याजवळ चाडी का लावता असे विचारले असता त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व चापट्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांचे वडील बाबू शेख व आई शारूकबी शेख भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनापण शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व चापट्यांनी मारहाण केली. आईच्या हातावर काठी मारून हाड फॅक्चर केले व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी बिल्किस युसुफ शेख यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात शफिक बक्शु शेख, सलीम बक्शु शेख, समरीन शफीक शेख, बुशाराबी सलीम शेख (सर्व रा. भावठाणा) यांच्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोहेकॉ मोरे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!