बांधावरील दगड काढल्यामुळे मारहाण

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
सामायिक बांधावरील रोवलेला दगड का काढलास असे कारण काढून मारहाण झाल्याची घटना डोंगरपिंपळा येथील भुंबरी शिवारात 5 तारखेला घडली. याप्रकरणी ८ तारखेला अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमराई येथील बालासाहेब नरसुबा केंद्रे यांचे डोंगरपिंपळा येथील भुंबरी नावाच्या शिवारात शेत आहे. ते शेतात गेले असता “तू सामायिक बांधावरील रोवलेला दगड का काढलास”? असे कारण काढून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. लाथा-बुक्क्यांनी, चापटांनी व दगडाने मारहाण करून मुकामार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बालासाहेब नरसुबा केंद्रे यांच्या फिर्यादीवरून सुग्रीव मुकुंदा केंद्रे, शिवाजी सुग्रीव केंद्रे, सुनंदा सुग्रीव केंद्रे (सर्व रा. उमराई) यांच्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक तागड हे करीत आहेत.