अंबाजोगाईक्राईम डायरी

तरुणास मारहाण करून अंगठी व पैसे काढून घेतले

अंबाजोगाई: शहरातील तथागत चौकात एका तरुणास रत्यात अडवून बेदम मारहाण करीत त्याच्या जवळील सोन्याची अंगठी व रोख रक्कम हिसकावून घेतल्याची घटना २५ फेब्रुवारी घडली. या प्रकरणी चौघाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील लखेरा गल्ली येथे राहणारा धनंजय संजय अंकुलवार (वय: २१) हा फायनान्सचे पैसे गोळा करून बसस्थानकाकडून तथागत चौकाकडे आला. तिथे राहुल पटेकर, आर्यन मादंळे व इतर दोन अनोळखी अशा चार तरुणांनी त्याला अडवले. त्यानंतर धनंजय अंकुलवार याच्या खिशातील आठशे रुपये आणि सोन्याची अंगठी काढून घेत लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!