अंबाजोगाईक्राईम डायरी

काचेची बाटली डोक्यात मारून डोके फोडले

अंबाजोगाई: जुन्या भांडणाची कुरापत काढून हातातील काचेची बाटली डोक्यात मारून डोके फोडून दुखावत केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील खडकपुरा भागात दि. ८ रोजी घडली. याप्रकरणी एका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

खडकपुरा भागात राहणारा ओमकार अंगद सावंत ( वय: १८) या तरुणास जयवंत भोसले (रा. खडकपुरा) याने तू कैवल्य चाटे यास फोन का केलास असे म्हणून भांडणाची कुरापत काढून हातातील काचेची बाटली ओमकार याच्या डोक्यात मारून डोके फोडले व शिवीगाळ केली. याप्रकरणी ओमकार सावंत याच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक येलमटे करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!