अंबाजोगाईक्राईम डायरी
जमीन वाटणी च्या कारणावरून उमराई येथे महिलेस बेदम मारहाण

अंबाजोगाई; जमीन वाटणीच्या कारणावरून एका महिलेस पती-पत्नीने बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उमराई येथे घडली. याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील उमराई येथे राहणाऱ्या उर्मिला लक्ष्मण केंद्रे( वय: ३०) यांना जमीन वाटण्याच्या कारणावरून आरोपींनी हातात दगड घेऊन डाव्या बाजूच्या बरगडीवर मारून दोन फासळ्या मोडल्या. भांडण सोडवीण्यासाठी उर्मिला यांचे पती आले असता त्यांना पण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उर्मिला लक्ष्मण केंद्रे यांच्या फिर्यादीवरून गोविंद रामभाऊ केंद्रे, जनाबाई गोविंद केंद्रे (दोन्ही रा. उमराई) या पती-पत्नी विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक मुंडे पुढील तपास करीत आहेत.