अंबाजोगाईक्राईम डायरी
तालुक्यातील नांदगाव येथे किरकोळ कारणावरून मारहाण; बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबाजोगाई: तालुक्यातील नांदगाव येथे किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथे दि 21 फेब्रुवारी रोजी यातील आरोपींतानी फिर्यादीस आणि तिचे सुनेस घरासमोर येऊन तुम्ही नाली वर पाण्याचे बॅरल ठेवायचे नाही व नाली वर पाणी सांडायचं नाही ते बॅरल काढून टाका असे म्हणून त्याच्या जवळच्या हातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत करून फिर्यादीस चापटा बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी अनिता बनसोडे( वय 35 रा नांदगाव) यांच्या फिर्यादी वरून विठ्ठल जयवंता जंगापाले यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात कलम 324,323,504 भादवी नुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक निंबाळकर करत आहेत.