अंबाजोगाई

अंबाजोगाईत हूंडा व संसार उपयोगी वस्तू नाकारूण आदर्श मंगल परिणय संपन्न

अंबाजोगाई:- शहरात एक मे रोजी आदर्श मंगल परिणय संपन्न झाला. वरपक्षाने कोणत्याही प्रकारचा हुंडा किंवा संसार उपयोगी वस्तू वधू पक्षाकडून घेतल्या नाहीत. असा ऐतिहासिक मंगल परिणय मयुर व प्रतिक्षा यांचा अंबाजोगाई शहरात संपन्न झाला.

जयभिमनगर मोरेवाडी येथील सेवानिवृत्त प्रा. मधुकर शिनगारे यांचा मुलगा मयुर व सायगाव येथील प्रकाश विश्वनाथ मस्के यांची मुलगी प्रतिक्षा यांचा मंगल परीणया निमीत्ताने या ऐतिहासीक सोहळा नागरीकांना पाहण्याचा योग आला. विवाह सोहळ्यात होणारा खर्च मुलीच्या वडिलावर न लादता, जो खर्च होईल तो एकत्रितपणे केला. कोणत्याही प्रकारच्या खर्चिक बैठकीचा डामडॉल न करता मुलाने- मुलगी आणि मुलीने- मुलगा पसंती कळवल्यास आणखी बैठका न घेता त्याच दिवशी लग्नाची तारीख काढली. दोन्ही कडून मंगल परिणयाची तयारी सुरू झाली आणि दिनांक १ मे २०२२ रोजी हा मंगल परिणय अगदी आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी मुलाच्या वडिलांची भुमीका समाजाला दशा मुक्त करण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा घेत असताना सुन कमी मुलगी अधिक अशीच आहे. वधुच्या वडीलांकडून कसलीही अपेक्षा नसणारी आहे. उदाहरणार्थ हूंडा संसारोपयोगी वस्तू, दिवाण, फ्रीज, कपाट, सोफा सेट, गाडी, कुलर सोन्याची अंगठी, सोन्याची चैन अशा वस्तु न स्विकारता हा मंगल परिणय संपन्न झाला.


देशात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होतात आणि स्त्री भ्रुण हत्या केली जाते. हा देशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी शिनगारे वरपक्षाच्या माता-पित्याने वरील गोष्टीचा त्याग करून अगदी साध्या स्वरूपाचे लग्नसोहळे साजरे करावे हा नवा संदेश समाजाला दिला. ज्यामुळे देश कलंकित होणार नाही. हे देशहिताचे आणि महामानवांना अभिप्रेत कार्य करीत समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे.

याप्रसंगी मुलीच्या आई वडिलांचे मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, हा सोहळा समाजाला नवी दिशा देणारा आणि स्त्री जातीचा सन्मान करणारा सोहळा आमच्या नशिबी आला हे आम्ही आमचे भाग्य समजतो. यापुढे आम्ही आमच्या मुलासाठी हुंडा घेणार नाहीत, सूनच मुलगी म्हणून स्वीकारू असे बोलून दाखवले. समाजात निरुपयोगी सोहळे उभे करण्यापेक्षा आनंदमय वातावरणात मंगल परिणय करावेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!