क्राईम डायरीधारुर

विवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

धारूर/प्रतिनिधी:

ऊस तोडणी येत नसल्याने विवाहितेचा सासरी सतत छळ करण्यात आला. अखेर त्या विवाहितेने छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील बोडका येथे उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला.

सुरेखा ज्ञानेश्वर उघडे (वय ३३, बोडका, ता. धारूर) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. सुरेखाची आई द्रौपदी संदीपन चोपडे यांचं फिर्यादीनुसार सुरेखाचे लग्न बोडका येथील ज्ञानेश्वर बुजा उघडे याच्यासोबत झाले होते. दोन वर्षातच तुला ऊस तोडणीचे काम येत नाही असे म्हणत पती ज्ञानेश्वर बुजा उघडे, सासू गंगुबाई, सासरा बूजा राजाराम उघडे आणि दिर रंजीत यांनी सुरेखाचा छळ सुरु केला. याबाबत सुरेखाच्या माहेरच्या लोकांनी अनेकदा सासरी समजावून सांगितले. परंतु तिचा छळ सुरूच राहिला. अखेर गुरुवारी सायंकाळी सुरेखाने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे उघडकीस येताच तिच्या कुटुंबीयांनी पळ काढला. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर सुरेखाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंद्रुड ठाण्यात नोंदविण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!