क्राईम डायरीबीड

जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या

तिघांवर गुन्हा दाखल

बीड /प्रतिनिधी:
हुंड्यासाठी वारंवार होत असलेल्या छळास कंटाळून एका 23 वर्षीय विवाहितेने गळफास ( Married women suicide )लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी( दि.२०) रात्री साडे नऊच्या दरम्यान शाहूनगर भागातील राहत्या घरी घडली. आरोपीवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी करत, यावेळी तिच्या नातेवाइकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.

पल्लवी विनोद जानवळे ( वय: 23 वर्ष रा. शाहूनगर बीड) यांचे एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दहा लाख रुपये हुंडा ठरला होता पाच लाख रुपये दिले होते. पाच लाख रुपये बाकी होते राहिलेल्या पाच लाखासाठी शारीरिक छळ सुरू होतात. त्या छळास कंटाळून पल्लवीने रात्री साडेनऊच्या सुमारास राहत्या घरी ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच माहेरकडील नातेवाईक शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले. जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक करत नाही तो पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पल्लवी चे वडील राजू नानासाहेब शिंदे (रा. मसाई अंबड जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून कलम 304, 306, 498अ, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास पीएसआय शेजुळ करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!